Mauli

सामान्य प्रश्न / FAQ

कार्यक्रम वेळापत्रक / मैदानावरील अन्य उपक्रम

कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. कृपया कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १५ मिनिटे आधी स्थळी पोहोचावे. शिबीर स्थळी पोहोचल्यावर ध्यान साधनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रदर्शन व स्टॉल्सला भेट देऊ शकता.

नोंदणी अनिवार्य आहे का?

होय. जर आपण यापूर्वी हिमालयीन समर्पण ध्यान शिबिरास उपस्थित राहिले नसाल, तर कृपया नोंदणी करावी. यामुळे आम्हाला शिबिराविषयी अधिक माहिती प्रदान करता येईल तसेच कार्यक्रमासाठी alert पाठवता येईल.

  • प्रवेशद्वारावरही थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध असू शकते.
  • हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व नि:शुल्क आहे.
  • ओळखपत्र आवश्यक नाही, परंतु प्रवेश प्रक्रियेतील सोयीसाठी Entry Pass - प्रवेश पासची प्रत (मुद्रित किंवा डिजिटल) सोबत ठेवावी.
मी माझ्या मुलांना सोबत आणू शकतो का?

कार्यक्रमासाठी किमान वयोमर्यादा १२ वर्षे आहे.
याहून लहान मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र आसनव्यवस्थेची सोय केली जाऊ शकते.

मी पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकणार नाही. मी थेट दुसऱ्या दिवशी सहभागी होऊ शकतो का?

होय. तथापि, आपण एकही दिवस गमावू नये, ही आमची विनम्र विनंती आहे, जेणेकरून आपण हिमालयीन सद्गुरूंच्या सान्निध्यात ध्यानधारणेचा संपूर्ण लाभ घेऊ शकता.
कृपया वेळेवर स्थळी पोहोचावे. उशिरा येणाऱ्यांना इतर साधकांच्या व्यत्यय टाळण्यासाठी मैदानाच्या मागील विभागात आसन मिळू शकते.

शिबिरासाठी कोणत्या वस्तू सोबत न्याव्यात?

आपण पिण्याच्या पाण्याची बाटली, एक कपड्याचा आसन व टोपी सोबत आणू शकता.
टीप: हे ध्यान योग शिबिर आहे आणि यात कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यायाम समाविष्ट नाहीत. कृपया योगा मॅट आणू नये.

बैठक व्यवस्था

ध्यानासाठी जमिनीवर भारतीय बैठकीत बसने हे सर्वात उपयुक्त आहे. शिबिर खुल्या मैदानावर होणार आहे. जमिनीवर एक साधी हिरवी मॅट अंथरण्यात येईल, तरीही कृपया आपले वैयक्तिक आसन सोबत आणावे.
जमिनीवर बसणे शक्य नसलेल्या साधकांसाठी मैदानाच्या बाजूने आणि मागील भागात खुर्च्यांची व्यवस्था केली जाईल.
आसन व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. लवकर येणाऱ्यांना मंचाच्या जवळ बसण्याची संधी मिळू शकते. मैदानावर विविध ठिकाणी मोठ्या डिजिटल स्क्रीन लावण्यात येतील, जेणेकरून सर्वांना स्पष्ट दृश्य मिळेल.

विशेष सूचना

कार्यक्रमादरम्यान छायाचित्रण व व्हिडिओ चित्रिकरण सख्त प्रतिबंधित आहे.
कृपया आपले मोबाइल फोन मौन किंवा फ्लाइट मोडवर ठेवा.
शिबिर सुरू झाल्यानंतर आपली जागा सोडू नये. यामुळे इतर साधकांच्या ध्यानधारणेचा व्यत्यय होतो तसेच अनावश्यक लक्ष वेधले जाते.
जर काही टाळता न येणाऱ्या कारणांमुळे तुम्हाला लवकर निघावे लागणार असेल, तर कृपया मैदानाच्या मागील भागात बसावे, जेणेकरून ध्यान करत असलेल्या इतरांना अडथळा होणार नाही.

परिवहन / पार्किंग

शिबीर स्थळी पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही.
दुचाकी, चारचाकी आणि बसेससाठी ४००-५०० मीटर अंतरावर निश्चित पार्किंग स्थळे उपलब्ध आहेत. कृपया स्वयंसेवक व वाहतूक पोलिसांच्या निर्देशांचे पालन करावे.
टीप: वाहन मालकाच्या जबाबदारीवर पार्किंग करावे. कार्यक्रम आयोजक याबाबत कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाहीत.
स्वतःच्या वाहनाने येण्याचे नियोजन असल्यास, कृपया कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान १ तास आधी स्थळी पोहोचावे. मुख्य प्रवेश मार्ग अरुंद असल्याने गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वाहतूक प्राधान्य द्यावी. मुख्य बसस्थानकापासून हे ठिकाण केवळ १० मिनिटांच्या पायदळ अंतरावर आहे.

Back to Registration